मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण
mukhyamantri ekanath shinde
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

भिवंडी- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी भिवंडीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या वतीने जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेसाठी मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण पक्षाचे उपनेते प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय कोणार्क आर्केड येथे बनविण्यात आले असून या कार्यालयाचे उद्घाटन देखील प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आठवडाभर ही लोकोपयोगी सेवाभावी कामे सुरूच राहणार असून आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले असल्याची माहिती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
           तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्र रात्र भर जागून राज्यातील नागरिकांची सेवा करीत आहेत त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात सेवाभावी कार्यक्रम आयोजित केली असून लोकसेवा आठवडा सर्वत्र राबविला जात असून जनसामान्यांना आवश्यक असलेले लोकोपयोगी कामे जिल्ह्यात सुरू असून आज या रुग्णवाहिकेचे लोकार्पण त्याचाच एक भाग आहे अशी प्रतिक्रिया बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते प्रकाश पाटील यांनी दिली आहे. या कार्यक्रमा प्रसंगी आमदार शांताराम मोरे यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी-माजी सभापती सदस्य व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
टिप्पणियाँ
Popular posts
जिल्हा परिषद ठाणे येथे ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ मार्गदर्शन कार्यशाळा
चित्र
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे येथे अभिवादन कार्यक्रम
चित्र
नवजात बाळांच्या स्वागतासाठी आगळीवेगळी संकल्पना; 'इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स' कडून पर्यावरण रक्षणाचा संदेश
चित्र
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची पाच वर्षे पूर्ण; समावेशित शिक्षणासाठी विशेष वैद्यकीय तपासणी शिबिर जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथे यशस्वीपणे संपन्न
जिल्हा परिषदेच्या वतीने ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ अभियानाला सुरुवात
चित्र