गुंदवली ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच सौ.चंद्रभागा वचन म्हात्रे यांची बिनविरोध निवड
भिवंडी: ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सौ. उमाबाई आत्माराम म्हात्रे यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा सहखुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी अध्याशी अधिकारी श्री. इंद्रजित काळे यांच्या आदेशाने व ग्रामविकास अधिकारी श्री.राकेश जोशी यांच्या खास उपस्थितीत रविवार दि. १२-०२-२०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय गुंदवली येथे सरपंचपदी निवडणूक घेण्यात आली. सदर निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंच पदासाठी सौ.चंद्रभागा वचन म्हात्रे यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध सरपंच पदी निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी श्री. इंद्रजित काळे यांनी जाहीर केले. त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी तसेच ग्रामपंचायतीचे आजी - माजी सरपंच, उपसरपंच व सदस्य मान्यवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळी उपस्तिथ होते. मला मिळालेली संधि ही गावाचे सर्वागीण विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता जी कामे उर्वरित विकासाची कामे आहेत ती कामे पूर्ण करण्याचा संकल्प नवनिर्वाचित सरपंच सौ.चंद्रभागा वचन म्हात्रे यांनी सांगितले. निश्चित गावाच्या विकासासाठी स्तुत्य उपक्रम राबवून चांगले काम होईल अशी अपेक्षा आहे. विकासाचे जे प्रलंबित कामे आहेत ते पूर्णपणे करण्याचा संकल्प नवनिर्वाचित सरपंच सौ.चंद्रभागा वचन म्हात्रे यांनी शेवटी सांगितले.