"सोनवणे साहेब भिवंडी क्र.३ नवनिर्वाचित सह दुय्यम निबंधक /रजिस्टार" पदी विराजमान।
भिवंडी सह-दुय्यम निबंधक (रजिस्ट्रार) माननीय श्री इंद्रवदनअ.सोनवणे साहेब यांची शहापूरहून भिवंडीत बदली झाल्या मुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षा सौ संगीताताई राजेश गायकवाड यांच्या वतीने त्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला असून त्यांच्यासोबत आरपीआय महिला आघाडीच्या सदस्या/पदाधिकारी सौ धनश्री विवेक माळशे तसेच नाट्यलेखक/साहित्यिक श्री राजेश त्र्यंबक गायकवाड. वृत्तपत्र लेखक .श्री विवेक विष्णू माळशे तसेच भगूर नगर परिषद जिल्हा नाशिक चे मा.नगरसेवक श्री शरद शंकर उबाळे हेही उपस्थित होते. श्री सोनवणे साहेब हे यापूर्वी शहापूर तालुक्यात कार्यरत होते. त्यांनी तेथे उल्लेखनीय कामगिरी केली असून सामान्यातील सामान्य व्यक्तीस आपुलकीने साद घालणारे प्रामाणिक आणि सचोटीने धडाडीने काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची शहापूरमध्ये ओळख व ख्याती आहे आणि आता सोनवणेसाहेब भिवंडीत देखील चांगले काम करून दाखवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला असून त्यांच्या प्रचंड व्यस्त कामकाजाच्या वेळातून वेळ काढून त्यांनी आम्हाला भेटावयाची वेळ दिली .काही कारणास्तव त्यांना उशीर झाला मात्र त्यांनी आम्हाला भेटीस नकार दिला नाही. त्यांनी शब्द पाळला आणि आम्हाला भेट दिली मनमोकळ्या गप्पाही झाल्या आम्हालाही समाधान लाभले कर्तव्यदक्ष अधिकारी भिवंडी कराना लाभले ही भिवंडीकरांसाठी
आनंदाची पर्वणी म्हणता येईल. असा मनोदय सौ संगीताताई गायकवाड यांनी व्यक्त केला..!!