आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ५११ ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे काल उद्घाटन झाले. त्यानंतर पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी मार्गदर्शन केले.
राज्य स्तरावर मुंबईत झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार आणि कौशल्य विकास मंत्री श्री. मंगल प्रभातजी लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती. तर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील आठगाव शिक्षण मंदिरातील केंद्राच्या उद्घाटनावेळी. या वेळी भारताचे भविष्य असलेल्या तरुण-तरुणींसह नागरिकांबरोबर संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील,
सरपंच रेखाताई पाटील, उपसरपंच कविता गोरक्ष भगत, आडगाव विद्यामंदिर शिक्षण संस्था अध्यक्ष तुकाराम पाटील ,वरूण सदाशिव पाटील अध्यक्ष कल्याण शहर भाजपा (मा. नगरसेवक) , कोन गाव चे ग्रामसेवक सुधाकर पारडे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपविभागीय अधिकारी अमित सानप व ठाणे जिल्हा ग्रामीण महिला आघाडीच्या संगिता गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण-तरुणी आणि नागरिकांची उपस्थिती होती.
ठाणे जिल्ह्यात ९ कौशल्य विकास केंद्रे सुरू होत आहेत. त्यात भिवंडी तालुक्यात अंबाडी व कोनगाव, अंबरनाथ तालुक्यात वांगणी, कल्याण तालुक्यात गोवेली व कांबा, मुरबाड तालुक्यात म्हसा व सरळगाव, शहापूर तालुक्यात मोखावणे व वासिंद गावांचा समावेश आहे. या केंद्रांच्या ठिकाणी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेण्यासाठी आवर्जून तरुण-तरुणी आणि महिलांनी भेट द्यावी.