वज्रेश्वरी- झिडके (विजय गायकवाड) भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ,वज्रेश्वरी या शिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक- 17/02/2024 रोजी दुपारी 03.00 वाजता दानशूर व्यक्ति सुरेंद्र चंदू कल्याणपूर,108 महामंडलेश्वर स्वामी नित्यानंद सरस्वती महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ,ही शिक्षण संस्था सन-1958 साली स्थापन करण्यात आली आहे.या शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रवर्तक माजी- आमदार दिवंगत- बी.एन्.भोईर,बाबासाहेब इनामदार,शंकर राऊत,सुरेश काॅन्ट्रॅक्टर,काशीराम पाटील,चंद्रकांत राऊत,गजानन पातकर आदि समाजसेवकांनी अत्यंत दुरगामी दृष्टीकोनातून शिक्षणापासून वंचित
असणाऱ्या भागाचा विकास व्हावा याकरिता या शिक्षण संस्थेची निर्मिती केली.यानंतर न्यू.इंग्लिश स्कूल वज्रेश्वरी व रेणुका विद्यालय झिडके अशा दोन माध्यमिक शाळेतून विद्यादानाचे कार्य सुरू केले.आजतागायत दोन्हीही शाळेत जवळपास 3000 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
यापैकीच न्यू.इंग्लिश स्कूल व एस्.एम्.काॅन्ट्रॅक्टर ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स व बी.एन्.भोईर ज्युनिअर काॅलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वज्रेश्वरी येथील शाळेची इमारत अत्यंत धोकादायक स्वरूपाची झाली होती,याकरिता शिक्षण संस्थेने दानशूर व्यक्ति सुरेंद्र कल्याणपूर यांच्याकडे सदर इमारत दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवल्यानंतर श्री.कल्याणपूर यांनी दुरूस्ती ऐवजी मी प्रशस्त नवीन इमारतच आपल्या विद्यार्थ्यांसाठी बांधून देण्याचे मान्य केले,व नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करून,ते अल्पावधीतच पूर्णत्वास नेले,आणि सदर नवीन इमारत शनिवार
दिनांक-17/02/2024 रोजी शिक्षण संस्थेच्या हाती सुपूर्द करण्यात आली.
हा कार्यक्रम ठाणे जिल्हा परिषदेचे माजी-सदस्य व जिल्ह्यातील तरूण,तडफदार युवानेते देवेश पुरूषोत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.या निमित्तानेच प्रमुख पाहुणे सुरेंद्र कल्याणपूर,108 महामंडलेश्वर स्वामी नित्यानंद सरस्वती महाराज,माजी-खासदार बळीराम जाधव,अक्षय कल्याणपूर,नेहा शेट्टी कल्याणपूर,अमृता कल्याणपूर,बाळाराम भोईर,नेहा दुबे (पंडीत)रामचरण उर्फ रामूकाका नाईक,राजेंद्र पाटील, सुधाकर जाधव,विनोद पाटील, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष-दिलीप पाटील,उपाध्यक्ष- सुभाष पाटील,सचिव-चंद्रकांत भोईर,स्कूल कमेटी अध्यक्ष-अरूण पाटील व विश्वस्त आदि मान्यवर मंडळी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांपैकी विनोद पाटील,वकील मंजित राऊत,देवेश पाटील,नेहा दुबे (पंडीत) बाळाराम भोईर,अक्षय कल्याणपूर,महामंडलेश्वर नित्यानंद महाराज आदिंनी आपली मनोगते व्यक्त करताना दानशूर व्यक्तिमत्त्व सुरेंद्र कल्याणपूर यांच्या रूपाने सदर संस्थेला परमेश्वर लाभले आहेत,त्याचबरोबर त्यांच्या विविध ठिकाणांच्या दानशूर सेवाभावी कार्याबद्दल आदरयुक्त भावना व्यक्त करून,श्री.कल्याणपूर यांच्या कर्तृत्ववान सद्गुणांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आल्या.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक- हरिदास पाटील सर,यांच्या कुशल मार्गदर्शनाखालीच पर्यवेक्षिका-विनया गायकवाड मॅडम,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारीवर्ग व विद्यार्थी यांच्या अथक मेहनतीने सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन साधना जोशी मॅडम यांनी केले.तर आभारप्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष-सुभाष पाटील यांनी पार पाडले अशा प्रकारे अत्यंत आनंदमय वातावरणात वज्रेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.