समितीचा शाखा अभियंता रंगेहात अटक !भ्रष्टाचाराचा बुरखा फाडला! – 2.20 लाखांची लाच घेताना भिवंडी पंचायत समितीचा शाखा अभियंता रंगेहात अटक!ठाणे | 28 एप्रिल 2025


ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) चमकदार कारवाईत भिवंडी पंचायत समितीतील बांधकाम विभागाचा शाखा अभियंता प्रमोद जुमळे याला तब्बल 2.20 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
तक्रारदाराने ग्रामपंचायतीच्या अंतर्गत बंदिस्त गटाराचे काम पूर्ण केल्यानंतर बिलाची प्रक्रिया सुरू होती. या बिलाच्या मोबदल्यात श्री. जुमळे यांनी 2.40 लाखांची लाच मागितल्याची तक्रार 15 एप्रिल रोजी ACB ठाणेकडे करण्यात आली होती.
संपूर्ण तक्रारीची पडताळणी 21 एप्रिल 2025 रोजी करण्यात आली, ज्यात अभियंत्याने तडजोड करत 2.20 लाख रुपये स्वीकारण्यास तयारी दर्शवली. यानंतर ACB पथकाने 28 एप्रिल रोजी काटेकोर सापळा रचत, श्री. प्रमोद जुमळे यांना पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक केली.
कारवाईचे नाट्यमय तपशील:
आरोपीने तक्रारदाराकडून पैसे स्वीकारलेले स्पष्टपणे सिद्ध झाले.
पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत त्याला ताब्यात घेण्यात आले.
सध्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून न्यायालयीन कारवाईस प्रारंभ करण्यात येणार आहे.
या धाडसी कारवाईमागील प्रमुख शिलेदार:
▶️ सापळा अधिकारी:
धर्मराज सोनके, पोलीस उप अधीक्षक, ACB, ठाण
▶️ सापळा पथक
मपोहवा/ जयश्री पवार
पोना/ विनोद जाधव
पोना/ बाळू कडव
▶️ मार्गदर्शन अधिकारी:
मा. श्री. शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक, ACB, ठाणे
मा. श्री. संजय गोवीलकर, अपर पोलीस अधीक्षक, ACB, ठाणे
मा. श्री. सुहास शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, ACB, ठाणे
ठाणे जिल्ह्यातील जनतेस जागरूकतेचे आवाहन:
जर कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांचे दलाल (एजंट) शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असतील, तर घाबरू नका – त्वरित खालील क्रमांकांवर संपर्क करा:
ACB ठाणे कार्यालय दूरध्वनी: 022 2542 7979
टोल फ्री क्रमांक: 1064
संपर्क अधिकारी: धर्मराज सोनके (मो.: 7066635666)
भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवा – लाचखोरांचा बुरखा फाडा!
ACB ठाणे तुमच्या सेवेत सज्ज आहे.
टिप्पणियाँ
Popular posts
भिवंडी वाडा रोड पर भंगार माफिया का तांडव
चित्र
सीलाई मशीन को कोई नही दे रहा है भाव निलेश भाऊ चले जाव गाव
चित्र
महिला पुलिस के लिए चलता फिरता विश्रामिका, पुलिस आयुक्त की हो रही है सराहना।
चित्र
उरण पूर्व विभागातील वीज समस्या लवकरच सुटणारदिघोडे येथे सबस्टेशनसाठी महावितरणकडे जागा हस्तांतरित !
चित्र