महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज.


महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज

भिवंडी: येत्या पावसाळ्यात संभाव्य घटना आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा यानुषंगाने आज भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे मा. प्रशासक तथा आयुक्त श्री. अनमोल सागर यांचे अध्यक्षतेखाली शहरामध्ये कार्यरत विविध आस्थापना व कार्यान्वित यंत्रणांच्या प्रतिनिधींसोबत आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक पार पडली. 
या बैठकीमध्ये आयुक्तांनी प्रामुख्याने धोकादायक इमारती, पुर परिस्थती निर्माण होणाऱ्या क्षेत्राचा आढावा, नागरीकांना स्थलांतरीत करावयाची वेळ आल्यास त्याची पर्यायी व्यवस्था, त्यांना लागणाऱ्या जेवणाची पाकिटे, आवश्यक सुविधांची तयारी, नाले सफाई, पाणी साचुन त्यामध्ये जर विद्युत प्रवाह प्रवाहित झाला तर करावयाची तातडीची उपाययोजना, वाहतुक कोंडी होऊ नये म्हणुन उपाययोजना, पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळण्यासाठी वैद्यकीय आरोग्य विभागाची तयारी, शहरामध्ये पावसाळ्यात कचरा साठुन दुर्गंधी व रोगराई पसरु नये याकरिता आरोग्य विभागाकडून करण्यात येत असलेल्या कायर्वाहीचा आढावा, शहरामध्ये विविध यंत्रणांकडुन सुरू असलेल्या कामाचा देखील आढावा घेण्यात आला. 
आयुक्तांनी या आढावा बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या यंत्रणांकडून सुरू असलेली रस्त्याची विकास कामे कोणत्याही परिस्थितीत मॉन्सुनपुर्वी पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या. तसेच, पोलीस विभागाला देखील सुचना दिल्या की, कोणत्याही परिस्थीतीमध्ये शहरामध्ये वाहतुक कोंडी होता कामा नये. आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रभाग स्तरावर आणि मुख्यालयस्तरावर 24x7 मनुष्यबळ व यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी. पुढील 4 महिने कोणीही रजेवर जाऊ नये. तसेच, मुख्यालय सोडण्यापुर्वी आयुक्तांची परवानगी घेण्यात यावी. प्रभाग कार्यालय, मुख्यालयातील आपत्ती वय्वस्थापन विभागातील सर्व दुरध्वनी क्रमांक सुरू आहेत आणि पुढील सर्व काळ सुरू राहतील याची खबरदारी आपत्ती व्यवस्थापन प्रमुख यांनी घ्यावी. कोणत्याही परिस्थतीमध्ये दुरध्वनी बंद राहता कामा नये. वैद्यकीय आरोग्य विभागाने आपत्कालीन परिस्थतीसाठी एक आपत्कालीन कक्ष सुरू करावा. तसेच, सर्व प्रकारच्या साथीचे आजार, अपघात घडल्यास त्यावर आवश्यक त्या सर्व औषधांचा साठा मुबलक प्रमाणात करण्यात यावा. जेणेकरुन, एैनवेळी औषधे कमी पडणार नाहीत.
जर एखाद्या ठिकाणी पाणी साचुन त्या ठिकाणी विद्युत प्रवाह पाण्यात प्रवाहीत झाल्यास टोरेंट कंपनीने तातडीने कारवाई करुन त्या भागातील विद्युत पुरवठा बंद करावा. वृक्ष अधिकारी यांनी शहरातील सर्व वृक्षांच्या धोकादायक फांद्याच्या छाटणी करावी, तसेच, ज्या वृक्षांच्या फांद्या ह्या विद्युत प्रवाहाला अडथळा ठरत असतील, त्यांची तातडीने छाटणी करावी. अग्निशमन विभागाने बोटी, अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी. तसचे, जनसंपर्क विभागाने शहरामध्ये या आपत्कालीन परिस्थीतीमध्ये काय करावे व काय करु नये याची जनजागृती करण्यात यावी. सर्व महत्त्वाचे दुरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करावे. आपत्कानलीन परिस्थतीमध्ये सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करुन नागरीकांनी माहिती उपलब्ध करुन द्यावी.
प्रभाग अधिकाऱ्यांनी शहरामध्ये 27 ठिकाणी पुर परिस्थती निर्माण होणाऱ्या स्थानांची यादी निश्चित केली आहे. या ठिकाणी जर पुर परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने जवळपासच्या समाज कार्यालय, शाळा येथे नागरीकांना स्थलांतरीत करुन त्यांच्या निवासाची व जेवणाची व्यवस्था करावी.
सर्व यंत्रणांच्या प्रमुखांनी या पुढील काळामध्ये एकमेकांशी सातत्याने समन्वय साधुन हे काम पार पाडावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. या प्रसंगी महानगरपलिकेचे मा. अति. आयुक्त (1) श्री. देविदास पवार, मा. अति. आयुक्त (2) श्री. विठ्ठल डाके, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. सचिन सांगळे, उपायुक्त (मुख्या) श्री. विक्रम दराडे, उपायुक्त (मार्केट) श्री. बाळकृष्ण क्षिरसागर यांचेसह महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महसुल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग, पोलीस विभाग, टोरेंट पॉवर यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
टिप्पणियाँ
Popular posts
नाप्ता साठवणुकीचा परवाना नसताना देखील मे. इंडियन ऑइल अदानी व्हेन्चर्स लिमिटेड या कंपनीचा नाप्ता साठवणुकीचा व्यवसाय चालू ?
चित्र
ग्रामीण भागातील जलस्रोतांची सुरक्षा आणि शाश्वतता दृढ करण्यासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
कर्करोग निदान व्हॅन — ठाणे जिल्ह्यात उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
चित्र
२०२५ " विविध मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान!हा पुरस्कार म्हणजे केवळ माझा नव्हे, तर पत्रकारितेत निष्ठेने काम करणाऱ्या प्रत्येक संघर्षशील पत्रकाराचा सन्मान आहे-डॉ. किशोर पाटील
चित्र