मागासवर्गीय शिक्षण संस्थेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांवरच अन्याय प्राचार्यांचा मनमानी कारभार

भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ संचालित बी एन एन महाविद्यालयात मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर प्रचंड अन्याय केला जात आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुवर्णा रावळ यांनी पदभार स्वीकारताच मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप बहुजन विद्यार्थी संघटनेने केला आहे. 
             पद्मश्री अण्णासाहेब जाधव ही शिक्षण संस्था मागासवर्गीयांची असून या संस्थेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांवरच अन्याय केला जात आहे. बी. एन.एन. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. रावळ यांनी इ. 12 मध्ये प्रवेश देताना जनरल गुणवत्ता यादी मध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा समावेश करायला हवा होता परंतु तसं न करता केवळ ओपन च्या विद्यार्थ्यांचीच सेप्रेट जनरल गुणवत्ता यादी बनवून इ. 11 वी अनुदानित तुकड्यांतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खास करून अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना ई. 12 वी त प्रवेश देताना विना अनुदानित तुकड्यांत टाकल्याने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे, त्यांची आर्थिक कोंडी प्राचार्या करीत आहेत.
           या अगोदर कधीही मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून बी. एन. एन.महाविद्यालयाने कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले नाही,कोणत्याही अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना विना अनुदानित तुकड्यामध्ये प्रवेश दिला नाही परंतु नव्याने आलेल्या प्रभारी प्राचार्या डॉ. रावळ यांनी नाहक मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय करीत असल्याचा आरोप बहुजन विद्यार्थी संघटनेने केला आहे. श्रीमती सुवर्णा रावळ ह्या नाहक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कट आखला आहे असा आरोपही बहुजन विद्यार्थी संघटने कडून केला जात आहे.
         मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जर येत्या दोन दिवसांत अनुदानित तुकडयामध्ये प्रवेश दिला नाही तर बहुजन विद्यार्थी संघटना तीव्र आंदोलन करेल असा ईशारा शहर अध्यक्ष नितेश गायकवाड यांनी दिला आहे.
टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र