PWD प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा विरोध पंकज गायकवाड
भिवंडी: भिवंडी-वाडा रस्त्याच्या निकृष्ट
कामाबाबत ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे सरचिटणीस पंकज गायकवाड यांनी तत्पूर्वी कवाड टोलनाक्यावर आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधून संबंधित ठेकेदारासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तू गीते यांच्यावर कारवाईसाठी ठाणे कार्यकारी अधीक्षक सुनील पाटील यांना लेखी निवेदन दिले होते. परंतु अधीक्षक सुनील पाटील यांनी पंकज गायकवाड यांना दिलेल्या खुलासा प्रत्युत्तरात भिवंडी- वाडा रस्त्याचे काम सुरळीतपणे सुरू असून यामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होत नसल्याचे म्हटले आहे. येत्या १७ मे पर्यंत या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दत्तू गीते यांच्यावर फौजदारी कारवाई न झाल्यास कार्यकारी अधीक्षक कार्यालयावर हल्लाबोल मोर्चाचा ईशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यासोबतच या रस्त्यावरून दैनंदिन प्रवास करणाऱ्या आजूबाजूच्या गावातील नागरिकांना या हल्लाबोल मोर्चात सहभागी होऊन संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा विरोध दर्शवण्याचे आवाहनही केले आहे.
टिप्पणियाँ
Popular posts
जिल्हा परिषद ठाणे येथे ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ मार्गदर्शन कार्यशाळा
चित्र
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे येथे अभिवादन कार्यक्रम
चित्र
नवजात बाळांच्या स्वागतासाठी आगळीवेगळी संकल्पना; 'इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स' कडून पर्यावरण रक्षणाचा संदेश
चित्र
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची पाच वर्षे पूर्ण; समावेशित शिक्षणासाठी विशेष वैद्यकीय तपासणी शिबिर जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथे यशस्वीपणे संपन्न
जिल्हा परिषदेच्या वतीने ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ अभियानाला सुरुवात
चित्र