खासदार बाळ्या मामा यांनी केली भिवंडी वाडा महामार्गाची पाहणी.

भिवंडी: भिवंडी वाडा महामार्गाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली असून या महामार्गावरून प्रवास करताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी घेतली असून शनिवारी बाळ्या मामा यांनी भिवंडी वाडा महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी केली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रकाश पाटील आमदार शांताराम मोरे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे भिवंडी उपअभियंता दत्तू गीते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
         भिवंडी वाडा रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली असून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे राज्य शासनाने विशेष लक्ष द्यावे अशी मागणी मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन तसेच प्रत्यक्ष भेटून व कार्यक्रमांवेळी वेळोवेळी केली आहे.येत्या चार दिवसात रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या असून लवकरच रस्ता सुस्थितीत करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्याला दिले असल्याची प्रतिक्रिया खासदार बाळ्या मामा यांनी दिली आहे.
टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र