जिल्हा परिषद शाळा अस्नोली येथे सोहळा उत्साहात पार
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व शिक्षणाचा उत्सव

(जिल्हा परिषद, ठाणे) –जिल्हा परिषद शाळा, अस्नोली येथे किन्हवली बीटमधील शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा दिनांक २३ जुलै, २०२५ रोजी जिल्हा परिषद, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून देण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे उपस्थित होते.

          या विशेष प्रसंगी रोहन घुगे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना प्रेरणा दिली. विशेषतः त्यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा केला, ही बाब विद्यार्थ्यांसाठी अनोखा व संस्मरणीय क्षण ठरला आहे. त्यांच्या या आत्मीयतेमुळे विद्यार्थी, शिक्षक व पालक भावूक झाले.

          शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्यांना पुस्तकांची भेट देण्यात आली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचाही जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यामुळे शिक्षकवर्गाला नव्या उर्जेचा अनुभव मिळाला.

          या कार्यक्रमात शहापुर ज्ञानकुंभ टीमने तयार केलेल्या “शिष्यवृत्ती मार्गदर्शक प्रश्नांचा खजिना” या पुस्तकाच्या प्रती भेट म्हणून देण्यात आल्या. अस्नोली शाळेला टेबल टेनिस युनिट भेट देण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करणारी मौलिक पुस्तके वाटप करण्यात आली.

           यावेळी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, गटविकास अधिकारी बाबू राठोड, गटशिक्षणाधिकारी रामचंद्र विशे, विस्तार अधिकारी संगीता माळी, केंद्रप्रमुख डॉ. राजेंद्र चौधरी (अल्याणी), पंचायत समितीचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनीत फर्डे, प्रास्ताविक राजेंद्र सापळे यांनी तर आभार प्रदर्शन सुधाकर पाटील यांनी केले.

           या सोहळ्याच्या माध्यमातून केवळ विद्यार्थ्यांचा नव्हे तर शिक्षक, पालक आणि संपूर्ण केंद्राचा सन्मान झाला आहे. किन्हवली बीट व अल्याणी केंद्रातील शैक्षणिक प्रगतीचे हे प्रतिबिंब असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद, ठाणे यांच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले आहे. अल्याणी केंद्राकडून इतरांनी देखील प्रेरणा घ्यायला हवी अशी अपेक्षा रोहन घुगे यांनी यावेळी व्यक्त केली.

टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र