गुंतवणूक जागृती कार्यशाळा व वाणिज्य मंडळाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.


फुंडे, उरण – सुनील ठाकूर /. 

वीर वाजेकर ए.एस.सी. कॉलेज, फुंडे येथील वाणिज्य विभाग व बीएमएस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा फाउंडेशनच्या सहकार्याने “गुंतवणूक जागृती कार्यशाळा” व “वाणिज्य मंडळाचे उद्घाटन” मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात प्रा. प्रांजल भोईर यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यानंतर प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद एन. ठक्कर यांनी अध्यक्षीय भाषणात गुंतवणुकीचे महत्त्व स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे पहिले सत्र NSE (राष्ट्रीय शेअर बाजार) या विषयावर होते. या सत्रात सेबी SMART प्रशिक्षक डॉ. प्रियांका राणी यांनी विद्यार्थ्यांना शेअर बाजारातील गुंतवणुकीची माहिती दिली. त्यांनी सेबीच्या नियमावली, गुंतवणुकीची सुरक्षा आणि गुंतवणूकदारांच्या अधिकारांबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. या सत्राच्या शेवटी प्रा. भूषण ठाकूर यांनी आभार प्रदर्शन केले.

दुसऱ्या सत्रात CDSL (सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लि.) विषयावर श्री. विनायक उप्पल यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी डिमॅट खाते, म्युच्युअल फंड व डिजिटल गुंतवणुकीचे फायदे यावर मार्गदर्शन केले. यानंतर प्रा. तन्वी कोळी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. दिक्षिता म्हात्रे यांनी केले.

या कार्यशाळेच्या आयोजनात प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद एन. ठक्कर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. प्रांजल भोईर, सह-समन्वयक प्रा. भूषण ठाकूर व सह-को-ऑर्डिनेटर प्रा. प्रियांका ठाकूर यांनी परिश्रम घेतले.

या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता वाढीस लागेल आणि गुंतवणुकीबाबतची माहिती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
टिप्पणियाँ
Popular posts
पाटोळेने केले ठाण्याचे वाटोळे!
चित्र
नवी मुंबई विमानतळ नामांतर वादाला तोडगा?
चित्र
मुंब्रा में महिला पत्रकार पर हमला — ट्रैफिक का लाइव रिपोर्ट करते समय गुंडों ने किया हंगामा, मोबाइल छीनकर की बदसलूकी
चित्र
. ‘माझी भाषा, माझा अभिमान’ — भिवंडीत अभिजात मराठी सप्ताह साजरा
चित्र
वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात धसई विद्युत कार्यालयावर नागरिकांचा निषेध मोर्चा !!
चित्र