डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पूर्व परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी ५ ऑगस्ट २०२५ मंगळवारी रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ८ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बारावे जलशुद्धीकरण केंद्रामधून हे काम करण्यात येणार आहे. महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व परिसरातील सर्व नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता ( तांत्रिक ) यांनी केले आहे.
केडीएमसी कडून ५ऑगस्ट ला पाणीपुरवठा राहणार बंद - नागरिकांना आवाहन ।